बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

आठवणी म्हणतात तुझी खूप आठवण येते!!!

आठवणी म्हणतात तुझी खूप आठवण येते!!!
तुझ्या आठवणींमध्येच पहाटेची दुपार,
निसटती कातरवेळ मग चांदण्याची रात्र होते....
आठवणींच्या सगळ्याच चांदण्या रात्रभर बोलत राहतात...
तुझ्या विषयामध्ये रमून जातात...
खूप हसतात,तुला आठवत आठवतच नकळत मग त्या विझतात...
पण विझण्याआधी तुझ्या आठवणींचा हात अलगद पहाटेच्या हातात देऊन जातात...
मी केव्हाच माझ्या हातातून तुझ्या आठवणींचा हात सोडत नाही....
त्या सतत माझ्यासोबत चालत असतात...चालत  असतात...!!!!