जसं जसं आपण मोठं होत जातो तश्या
आपल्या प्रायोरिटीज बदलत जातात. अनेक स्थळे, घटना, त्यांच्यांशी संबंधित
व्यक्ती यांचे संदर्भ बदलत जातात. बदलत जातात फक्त; नाहीसे होत नाहीत. :)
ते आतवर कुठेतरी खोल दडून बसतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक जागा, प्रत्येक
माणूस!! फक्त आपल्याला हे लक्षात आहे हेच आपल्या लक्षात नसतं! आणि मग अश्या
काही क्षणांचं कुलूप उघडण्यासाठी काही किल्ल्या असतात. एकत्र घालवलेल्या
दिवसांचे फोटो.. एखादी घटना किंवा असंच काहीतरी. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे
ही किल्ली वेगळी असेलही कदाचित.. पण ती असतेच असते!! माझ्या बाबतीत म्हणाल
तर असंख्य गाणी हा मला या जुन्या क्षणांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे...
आता विचार केला तर योगायोगाचं आश्चर्य वाटतं पण अशी बरीच गाणी आहेत जी ऐकली
कि मी एका विशिष्ट घटनेशी, काळाशी किंवा व्यक्तीशी जोडली जाते. आणि मग
एखाद्या जुन्या पेटीसमोर बसून राहावं, त्यातून बाहेर पडणाऱ्या एकेका
वस्तूने आठवणींवर पडलेली जळमटं अलगद दूर व्हावीत आणि सगळं लख्ख दिसू
लागावं.. असंच होत आलंय माझं आजवर!!! या अश्याच गाण्यांना आठवण्याचा हा
प्रयत्न....
आमच्या नवीन घराची वास्तूशांती होती. ९०-९१ सालची गोष्ट आहे. तेव्हा बेटा सिनेमा मधलं "कोयलसी तेरी बोली" हे गाणं खूप गाजलं होतं (खरंतर धक धक ची क्रेज जास्त होती, पण आमची वयं लक्षात घेता कोयलसी तेरी बोलीच "चार्ट-बस्टर" होतं!!) तर ते आमच्या घराच्या ग्यालरीमध्ये टेपवर लावलं जायचं आणि माझी मावसबहीण त्यावर नाच करायची. आजदेखील कुठेही बेटा किंवा ते गाणं लागलं तर माधुरी-अनिल कपूर न आठवता माझी ती मावसबहीण आणि वास्तू साठी जमलेल्या नातेवाईकांचा गोतावळा आठवतो. आणि मग मुंग्यांची रांग लागावी तसे एका पाठोपाठ एक तेव्हाच्या वेगवेगळ्या आठवणी समोर येत राहतात. परवा सहज ते गाणं लागलं तेव्हा माझ्या त्या बहिणीला म्हटलं "आठवतं का गं हे गाणं?" त्यावर तिने माझ्याकडे असं काही पाहिलं कि एकदम जाणवलं आपल्या फ्रिक्वेन्सीज वेगळ्या आहेत.. माझ्या आठवणीतलं हे स्टेशन तिच्या मनात नाहीये.
त्यानंतर आमच्या घरी जुना बाबांच्या जमान्यातला टेप जाऊन सीडी प्लेयर आला. अत्र्यांच्या खानदानातला पहिलाच सीडी प्लेयर ना.. त्यामुळे सगळ्यांनाच पहिलटकरणीच कौतुक. त्याबरोबर २ सीडी फ्री मिळाल्या होत्या. एक "देव माझा विठू सावळा" अशी पांडुरंगावरील 'अभंग' प्रेमाची आणि दुसरी "आशिकी" ही प्रेयसीवरील प्रेमाचे अभंग असलेली :) :) आमच्या घरातील बहुजन समाजाचा विठूरायापेक्षा आशीकीकडे ओढा अधिक... त्यामुळे दादाकडून शिकून घेऊन स्वत:हून सीडी प्लेयर लावून ऐकलेलं "मै दुनिया भुला दुंगा तेरी चाहत में" हे एक गाणं अजूनही आठवतं!! त्यावेळी मी आणि बहिणीने त्यावर केलेला बॉल डान्स... "पोरीच्या जातीला असं सारखं नाचणं-ओरडणं शोभतं का?" असं विचारून आत्याकडून मिळालेला प्रसाद. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कळत्या वयात जेव्हा या गाण्याचा वीडीओ पाहिला तेव्हा तेलकट चेहऱ्याची अनु अगरवाल आणि सुतकात असल्याचा चेहरा केलेला तो राहुल रॉय पाहून झालेला तीव्र दु:खावेग!! "दृष्टीआड सृष्टी" असं जुने जाणते लोकं का म्हणून गेलेत ते पटतं अश्यावेळी. असो... पण आज देखील ते गाणं ऐकलं की (पहायची हिम्मतच नाहीये बाबा) की तीच तावातावाने सीडी प्लेयरचं manual वाचून त्यानुसार ते गाणं लावायला तडफडणारी मी डोळ्यासमोर येते आणि नकळत ओठात हसू येतं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा